NICL Assistant Bharti 2026:
Assistant हे पद class-3 अंतर्गत येणारे पद असून त्याचे मुख्य कार्य विमा पॉलिसी ग्राहकांच्या नावावर नोंदवणे, त्यांची कागदपत्रे तपासणे ग्राहकांकडून विम्याचा प्रिमियम (हप्ता) स्वीकारणे, त्याच्या पावत्या देणे आणि कॅश काउंटरची दैनंदिन खाती सांभाळणे हे असते.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,पगार आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :
NEW UPDATE
NICL Assistant Recruitment
🏢 भरती विभाग
National Insurance Company Limited
💼 पदाचे नाव
Assistant
🔥 एकूण जागा
500 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील :
१. असिस्टंट (500 जागा):
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त असणे गरजेचे.
महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १8 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट २०२६
अर्ज फी:
General/OBC/EWS: 850₹
SC/ST/PWD/ExSM/: फी नाही
वयोमर्यादा:
दिनांक ०१.०7.२०२६ रोजी वय २1 वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]
अधिकृत वेबसाईट: [Click Here]
निवड प्रक्रिया (Selection process):
Phase-I: Preliminary Exam :
- ही पहिली ऑनलाइन परीक्षा असते, जी केवळ पात्रता (Qualifying) निकष म्हणून घेतली जाते.
- यामध्ये इंग्रजी भाषा, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या विषयांवर आधारित एकूण १०० गुणांचे वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्न विचारले जातात.
- या परीक्षेचे गुण Final Merit List मधे जोडले जात नाहीत.
Phase-II: Main Exam :
- पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
- यामध्ये सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान , इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश असतो आणि एकूण २५० गुणांचे वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्न विचारले जातात.
Phase-III: Regional Language Test :
- मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्याच्या अधिकृत स्थानिक भाषेची चाचणी (Test) द्यावी लागते.
- ही चाचणी केवळ पात्रता स्वरूपाची (Qualifying) असते.
Phase-IV: Final Merit & Document Verification :
- मुख्य परीक्षेतील गुण आणि स्थानिक भाषा चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांची Final Merit List प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर मूळ कागदपत्रांची तपासणी (Document Verification) करून अंतिम नियुक्ती दिली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) असते का ?
उत्तर : होय, Assistant या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातात.
Q2. पदवीच्या शेवटच्या वर्षाला (Final Year) असताना Assistant ची परीक्षा देऊ शकतो का ?
उत्तर : नाही, तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना या परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्या हातात पदवी असणे बंधनकारक आहे.
