AIIMS Nursing Officer Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये 'नर्सिंग ऑफिसर' पदाच्या 2216 जागांसाठी मेगा भरती!

AIIMS Nursing Officer Bharti 2026:

नर्सिंग ऑफिसर  हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मधील अत्यंत जबाबदारीचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे जे की Group-B अंतर्गत येते. रुग्णालयातील रुग्णांची सर्वसमावेशक काळजी घेणे, डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषधोपचार व वैद्यकीय उपचार पार पाडणे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार करणे, आयसीयू (ICU) व वॉर्डमधील वैद्यकीय उपकरणांची देखभाल करणे आणि रुग्ण व डॉक्टरांमधील समन्वयाचा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणे हे नर्सिंग ऑफिसरचे मुख्य कार्य असते. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे : 


AIIMS Nursing Officer Bharti 2026:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये 'नर्सिंग ऑफिसर' पदाच्या 2216 जागांसाठी मेगा भरती!



NEW UPDATE
📢

AIIMS Nursing Officer Recruitment 

🏢 भरती विभाग
All India Institute of Medical Sciences 
💼 पदाचे नाव
 नर्सिंग ऑफिसर
🔥 एकूण जागा
2216 जागा
📝 अर्ज पद्धत
ऑनलाइन (Online)
📍 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत 


पद आणि शैक्षणिक पात्रता तपशील : 

१. नर्सिंग ऑफिसर (2216 जागा):
पात्रता : B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. Nursing किंवा B.Sc. (Post-Certificate) / Post-Basic B.Sc. Nursing आणि राज्य किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिलकडे (State / Indian Nursing Council) 'Registered Nurse and Midwife' म्हणून नोंदणी असावी.
OR
GNM (General Nursing Midwifery) डिप्लोमा आणि राज्य किंवा भारतीय नर्सिंग कौन्सिलकडे (State / Indian Nursing Council) 'Registered Nurse and Midwife' म्हणून नोंदणी आणि ५० खाटांच्या (50-Bedded) रुग्णालयातील २ वर्षांचा कामाचा अनुभव.

महत्त्वाच्या तारखा आणि फी :
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2026 

अर्ज फी: 
General/OBC: 3000₹
SC/ST/EWS: 2400₹
PWD: फी नाही 
वयोमर्यादा: 
दिनांक 13.०8.२०२६ रोजी वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 (OBC: +३ वर्षे आणि SC/ST: +५ वर्षे सवलत)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
अधिकृत जाहिरात PDF (Notification): [Click Here]
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online): [ Direct Apply Link ]

अधिकृत वेबसाईट: [Click Here]

निवड प्रक्रिया (Selection process):

Phase-I: NORCET Prelims :
  • ही पहिली संगणक आधारित चाचणी (CBT) असते, जी केवळ पात्रता (Qualifying) निकष म्हणून घेतली जाते.
  • यामध्ये एकूण १०० गुणांचे वस्तुनिष्ठ (MCQs) प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने नर्सिंग विषय तसेच सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश असतो.
  • या परीक्षेचे गुण Final Merit List मधे जोडले जात नाहीत.
Phase-II: NORCET Mains :
  • पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
  •  या परीक्षेत १०० गुणांचे प्रश्न असतात, जे पूर्णपणे क्लिनिकल स्किल्स, केस स्टडीज आणि नर्सिंग विषयातील व्यावहारिक ज्ञानावर (Case Scenario Based) आधारित असतात.
  • उमेदवारांची अंतिम निवड प्रामुख्याने या मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच केली जाते.
Phase-III: Document Verification :
  • मुख्य परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या (शैक्षणिक पात्रता, नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी) तपासणीसाठी बोलावले जाते.

Phase-IV: Medical Examination :
  • Document Verification यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर संबंधित AIIMS संस्थेकडून उमेदवाराची अंतिम नियुक्तीपूर्वी शारीरिक व वैद्यकीय तपासणी केली जाते.


वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) :
Q1. परीक्षेमध्ये नकारात्मक गुण (Negative Marking) असते का ?
उत्तर : होय, नर्सिंग ऑफिसर या  परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते.परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातात.

Q2. पदवीच्या शेवटच्या वर्षाला (Final Year) असताना Nursing Officer ची परीक्षा देऊ शकतो का ?
उत्तर : नाही, तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना या परीक्षेसाठी अर्ज करू शकत नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे सर्व वर्षांचे मार्कशीट/पासिंग सर्टिफिकेट आणि State / Indian Nursing Council कडून 'Registered Nurse and Midwife' चे रजिस्ट्रेशन (नोंदणी) पूर्ण झालेले असावे लागते.